Crime News
Crime News sakal

Crime News: पडघा येथे भोंदूबाबाला रंगेहाथ अटक; वाचा काय अडकला ट्रॅपमध्ये

Padgha News: आजारी महिलेला बरे करण्याच्या बहाण्याने जादूटोण्याचा बनाव रचणाऱ्या भोंदूबाबाचा कट पडघा येथे उधळून लावण्यात आला आहे.

याप्रकरणी सुनील चौबे या भोंदूबाबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

Crime News
Crime News: हॉटेलचा वेटरच निघाला चोर; पाच लाख घेवून गेला पळून!

पीडित कुटुंबातील विवाहित तरुणी हा काही कारणांमुळे तिच्या माहेरीच राहते. ती सतत आजारी असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला टिटवाळा येथे सुनील चौबे या मांत्रिकाकडे नेले. तरुणीबद्दल काही माहिती सांगितल्याने कुटुंबीयांचा त्याच्यावर विश्‍वास बसला. या तरुणीला करणी करण्यात आली असून ती उतरवण्यासाठी मांत्रिकाने त्यांना २० एप्रिलला टिटवाळा येथे बोलावले.

तसेच त्यांच्याकडून पाच हजार रुपये दक्षिणा घेतली. करणी उतरवण्यासाठी ज्या व्यक्तीकडून त्रास आहे त्याचा फोटो आणण्यास या मांत्रिकाने सांगितले होते. तसेच, कुंभारशिव येथे स्मशानभूमीत जाऊन पूजा करावी लागेल, असे सांगितले.

Crime News
Nashik Fraud Crime : जपान टूरच्या नावाखाली घातला 8 लाखांचा गंडा! पूर्वा हॉलिडेज टूरच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल

त्यानुसार सुनील चौबे याने लिंबू, नारळ, बाहुली, टाचण्या, तांदूळ, हळदी-कुंकू इत्यादी सामान रचत पूजा विधी करण्यास सुरुवात केली. ही बाब कुंभारशिव येथील राजे शिवाजी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी योगेश जाधव, पोलिस पाटील सतीश पाटील यांना समजली.

त्यानंतर ते गावकऱ्यांसमवेत तिथे दाखल झाले व भोंदूबाबाचा कट उधळून लावला. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Nashik Fraud Crime : जपान टूरच्या नावाखाली घातला 8 लाखांचा गंडा! पूर्वा हॉलिडेज टूरच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com