समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यूत  घट

समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यूत  घट
Published on

समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यूत  घट
गंभीर जखमींच्या संख्येत वाढ
 सकाळ वृत्तसेवा
 मुंबई :  मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील वाढत्‍या अपघातांमुळे आरटीओने या महामार्गावरील गस्त वाढवून वाहनांना शिस्त लावण्यासाठी गेली दोन वर्षे उपाययोजना केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा  एकीकडे अपघाती मृत्यूत  घट झाली आहे, तर दुसरीकडे गंभीर अपघात आणि जखमींमध्ये वाढ झाली आहे. 
   जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या आठ महिन्यांत समृद्धी महामार्गावर ६३ प्राणांकित अपघातात १२० जणांचा बळी गेला होता. यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट २०२४ मध्ये ५७ प्राणांकित अपघातात ८० जणांचा बळी गेला आहे. म्हणजे प्राणांकित अपघातांच्या संख्येत १० टक्के घट झाली आहे, तर एकूण अपघाताच्या संख्येत १९ टक्के घट झाली आहे.
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर २०२३ मध्ये ८१ प्राणांकित अपघातात १५१ जणांचे प्राण गेले, तर गंभीर जखमी करणारे १७ अपघात घडले असून त्यात ४२ जण गंभीर जखमी झाले, तर किरकोळ जखमी असणारे २२ अपघात घडले असून ५२ जण किरकोळ जखमी झाले, तर १४ अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. २०२३ मध्ये एकूण १३४ अपघात घडले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे, तर यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या आठ महिन्यांमध्ये अपघातांची संख्या घटली असून या काळात ५७ अपघात घडले आहेत. त्यात ८० जण जखमी झाले आहेत. म्हणजे प्राणांकित अपघाताची संख्या १० टक्के घटली आहे, तर किरकोळ जखमी होणारे आठ अपघात घडले असून त्यात १७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी अपघातांच्या संख्येत ६० टक्के घट झाली असून किरकोळ जखमींच्या संख्येत ५८ टक्के घट झाली आहे.

आठ इंटरसेप्टर व्हेईकल तैनात 
नाशिक ते नागपूर या मार्गावर आठ इंटरसेप्टर व्हेईकल तैनात करण्यात आल्‍या आहेत. ओव्हर स्पीडिंग वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी लेझर गनचा वापर करण्यात येत आहे. सर्व बसचालकांची ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह मोहिमेत ब्रेथ अनालायझर टेस्ट करण्यात आली. ट्रेड गेज मशीनद्वारे टायरची तपासणी करण्यात आली. अनफिट व्हेईकलची तपासणी करण्यात आली, तर लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवरदेखील कारवाई केली गेली.

वाहनचालकांचे समुपदेशन 
ओव्हर स्पीडींग ड्रायव्हरांचे टोल प्लाझा येथे काऊन्सिलिंग करण्यात आले. समृद्धी महामार्गावर एक लाख तीन हजार २६१ टायर तपासणी, एक हजार ५६४ रेफलेक्टींग टेप, १८ हजार ७७६ बस आणि २४ हजार आठ मालवाहतूक चालकांची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट करण्यात आली. त्यात १०९ बसचालक आणि ५३ अवजड चालक दोषी आढळले. तीन हजार ८७९ ड्रायव्हरांचे काऊन्सिलिंग केले गेले. अशा या कारवाईत एकूण ३३ लाख ५६ हजार २०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com