Old Elphinstone Bridge : 100 वर्षे जुन्या लोखंडी एल्फिन्स्टन पुलावर एप्रिलमध्ये पडणार हातोडा; प्रभादेवीच्या उड्डाणपुलाचे कधी काम सुरू होणार?
मुंबई वाहतूक पोलिसांकडून अंतिम परवानगी मिळण्याची प्रतीक्षा असली तरी ती १० एप्रिलपूर्वी मिळू शकेल, अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली.
मुंबई : एमएमआरडीएकडून उभारल्या जात असलेल्या शिवडी-वरळी कनेक्टरचा भाग असलेला डबल डेकर उड्डाणपूल प्रभादेवी येथे उभारण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या १०० वर्षे जुन्या लोखंडी एल्फिन्स्टन पुलावर एप्रिलमध्ये हातोडा पडणार आहे. त्याकरिता एमएमआरडीएने येथील वाहतूक अन्यत्र वळवावी म्हणून वाहतूक विभागाकडे (Transport Department) परवानगी मागितली असून, ती १० एप्रिलपर्यंत मिळू शकणार आहे. त्यामुळे येथील लोखंडी पुलावर हातोडा पडणार असल्याचे निश्चित झाले असून, नव्या पुलाच्या कामालाही सुरुवात होणार आहे.
मुंबई शहरातील वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच अटल सेतूवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना थेट वरळी आणि पुढे कोस्टल रोड, वांद्रे सी लिंकवर जाता यावे, यासाठी एमएमआरडीए साडेचार किलोमीटर लांबीचा वरळी-शिवडी एलिव्हेटेड कनेक्टर उभारत आहे. प्रभादेवी येथे पश्चिम आणि मध्य रेल्वे क्रॉसिंगसाठी तब्बल तीन हजार मेट्रिक टन वजनाचा महाकाय डबल डेकर लोखंडी ब्रीज उभारला जाणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएकडून जुन्या पुलाचे पाडकाम व नव्या पुलाच्या उभारणीच्या दृष्टीने तांत्रिक आणि सुरक्षा बाबींची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच मुंबई वाहतूक पोलिसांकडून अंतिम परवानगी मिळण्याची प्रतीक्षा असली तरी ती १० एप्रिलपूर्वी मिळू शकेल, अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली.
मुंबईतील पहिला लोखंडी डबल डेकर
प्रभादेवी येथे एल्फिन्स्टन ब्रिजच्या ठिकाणी उभारला जाणारा हा ब्रिज मुंबईतील पहिला लोखंडी डबल डेकर ब्रिज ठरणार आहे. रेल्वे ट्रॅकला क्रॉस करून जाणाऱ्या या ब्रिजच्या खालच्या भागाचा प्रभादेवी-परळ आशा पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या वाहनांना वापर करता येणार आहे, तर वरील डेकवरून थेट अटल सेतूच्या दिशेने जाणारी वाहने असणार आहेत. पुश-पूल पद्धतीने हा डबल डेकर ब्रिज उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
असा असेल डबल डेकर
प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) येथे मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर सध्या असलेला लोखंडी पूल १३ मीटर रुंद आणि तीन मार्गिकांचा आहे. या जुन्या पुलाच्या जागी नवीन ‘डबल डेकर’ ब्रिज उभारण्यात येणार आहे.
-पुलाचा पहिला स्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि सेनापती बापट मार्ग यांचेदरम्यान वाहतुकीसाठी प्रत्येकी दोन लेन
-दुसरा स्तर : अटल सेतूपासून वरळीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी दोन लेन
या पुलाला ९५ मीटर व ३७ मीटर लांबीचे दोन स्पॅन्स असणार
-सुपरस्ट्रक्चरचे सुमारे तीन हजार आणि १२०० मेट्रिक टन एवढे वजन असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.