चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा आक्षेप

चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा आक्षेप
Published on

चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा आक्षेप
दोन संचालकांपैकी एकाचा विरोध; ठरावाला बहुमताचा पाठिंबा नसल्याता दावा


नवी दिल्ली (पीटीआय), ता. २० : टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीच्या निर्णयाला टाटा ट्रस्टने आव्हान दिले आहे. टाटा सन्सच्या ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’नुसार ट्रस्टने नियुक्त केलेल्या संचालकांच्या बहुमताचा सकारात्मक पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या ‘कास्टिंग व्होट’च्या आधारे हा निर्णय वैध ठरविता येणार नाही, असा दावा टाटा ट्रस्टने केला आहे.

टाटा सन्सच्या १७ सप्टेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चंद्रशेखरन यांना आणखी पाच वर्षांची मुदत देण्याचा ठराव ४-१ मतांनी मंजूर झाला होता. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी या प्रस्तावाला विरोध केला, तर ट्रस्टचे दुसरे नामनिर्देशित संचालक वेणू श्रीनिवासन यांनी समर्थन केले. मात्र, दोन ट्रस्ट-नामनिर्देशित संचालकांपैकी एकाने विरोध केल्याने आवश्यक बहुमत मिळाले नाही, असे ट्रस्टने म्हटले आहे. नोएल टाटा यांच्या विरोधामुळे संचालक मंडळात मतभेद निर्माण झाल्याने अध्यक्षांचा कास्टिंग व्होट लागू होऊ शकतो, हा युक्तिवादही ट्रस्टने फेटाळला. कास्टिंग व्होट केवळ संपूर्ण संचालक मंडळाच्या मतदानात समान मते पडल्यास लागू होतो; ट्रस्टच्या नामनिर्देशित संचालकांच्या मतदानावर तो लागू होत नाही, असे ट्रस्टने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर १७ सप्टेंबरचा ठराव वैधरीत्या मंजूर झालेला नसून त्याला कायदेशीर परिणाम नाही, असा दावा ट्रस्टने केला आहे. मात्र, टाटा सन्सने चंद्रशेखरन यांची फेरनियुक्ती वैध असल्याच्या भूमिकेवर पुढील प्रक्रिया सुरू ठेवली आहे.

टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समधील सुमारे ६६ टक्के हिस्सा आहे. दरम्यान, टाटा सन्सच्या संभाव्य सूचीबद्धतेच्या मुद्द्यावरूनही ट्रस्ट आणि कंपनीमध्ये मतभेद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com