सरकारी आदेश धाब्यावर, अभूतपूर्व कोंडीत टोल वसुली, पैसे परत देण्याचं धोरणच नाही

Mumbai Pune Express Way द्रुतगती महामार्गावर गॅस टँकरच्या भीषण अपघातामुळे तब्बल ३५ तास वाहतूक कोंडी झाली होती. तेव्हा टोल वसूल करण्यात येऊ नये,असे आदेश सरकारने दिले होते. मात्र या आदेशाला हरताळ फासण्यात आलाय.
Government Order Ignored During Massive Highway Congestion

Government Order Ignored During Massive Highway Congestion

Esakal

Updated on

सुजित गायकवाड : सकाळ वृत्तसेवा, नवी मुंबई, ता. १४ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ३५ तासांच्या अभूतपूर्व कोंडीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी त्यांचीच तब्बल पाच कोटी १६ लाख आठ हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेल्या या कोंडीमुळे हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडून टोल वसूल करण्यात येऊ नये,असे आदेश सरकारने दिले होते; मात्र सरकारच्या त्या आदेशाला हरताळ फासत टोल कंपनीने प्रवाशांचीच लूटमार केली. Questions raised over toll collection during 35 hour expressway congestion

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com