esakal | डोंबिवली : महापालिकेला उशिरा सुचले शहाणपण
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : महापालिकेला उशिरा सुचले शहाणपण

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : रस्त्यावरील खड्ड्यांवरून कल्याण (Kalyan) डोंबिवली (Dombivali) महापालिकेला (Municipal) जाब विचारण्यास आता सर्वसामान्य नागरिकांना देखील सुरवात केली आहे. समाज माध्यमातून पालिका प्रशासनाला ट्रोल केले गेले. पावसाळ्यात अनेक अडचणींना तोंड दिल्यानंतर आता पावसाळा संपत आल्यानंतर पालिकेला शहाणपण सुचले असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी पालिकेने टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. जागरूक नागरिक या टोल फ्री क्रमांकावर आता तक्रारींचा पाऊस पडतो का हे पहावे लागेल.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेले तीन महिने सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणात पालिकेला दिसून आल्या आहेत. पावसाची उघडीप मिळाल्याबरोबर महानगरपालिकेने यापूर्वीच खड्डे भरण्याचे व रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. खडी टाकून खड्डे बुजविले जात असले तरी परतीचा पाऊस तीन चार दिवस सुरू असून या पावसामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले आहेत.टोल

हेही वाचा: टोल नाक्यावरील गुंडगिरी थांबवा - बळीराजा शेतकरी संघटना

त्यामुळे आता या टोल फ्री क्रमांकावर खड्ड्यांविषयी तक्रारींचा पाऊस पडतो का हे पहावे लागेल. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेसाठी म्हणजेच, रस्त्यांवर पदलेल्या खड्ड्यांची तक्रार नोंदविण्याकरिता 1800 233 0045 या टोल फ्री क्रमांक ची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डयांबाबतच्या आपल्या तक्रारी कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळी या टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांनी केले आहे.

loading image
go to top