टॉप्स ग्रुप प्रकरणः नंदा यांचे विश्वासू एम. शशीधरन यांना अटक

टॉप्स ग्रुप प्रकरणः नंदा यांचे विश्वासू एम. शशीधरन यांना अटक

मुंबई: टॉप्स ग्रुपचे संस्थापक आणि कंपनीतील वरिष्ठ अधिकारी एम. शशीधरन यांना सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) अटक केली. याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स पाठवण्यात आला होता.

पैशांच्या व्यवहारांमध्ये शशीधरन यांची प्रमुख भूमिका असल्याचा ईडीला संशय आहे. पैशांचे व्यवहार शशीधरन मार्फत झाले असून त्याबाबत माहिती घेण्यासाठी त्याची चौकशीची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही या प्रकरणातील दुसरी अटक आहे. शशीधरन हा तोच व्यक्ती आहे. ज्याच्यामार्फत नंदा यांनी केलेल्या तक्रारीनंतर टॉप्स ग्रुपचे माजी उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी चंडोळेला याप्रकरणी ईडीने अटक केली होती. त्याला पुन्हा ताबा घेण्यात आला आहे. एमएमआरडीएमधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे.

अमित चंडोळे याला अटक केल्या ईडीने त्याच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर  गंभीर आरोप केले होते. चंडोले आणि शशीधरन यांना एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच चंडोळेचा ताबा ईडीने घेतला. 

एमएमआरडीए सुरक्षा रक्षक कंत्राट मधील 30 टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील 50 टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचा. असे टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांनी सांगितले होते. मुंबईतील सर्व उड्डाण पुलांवर सुरक्षा रक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे एमएमआरडीएचे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळाले होते.

अमित चंडोलेला टॉप्स ग्रुप दर महिना 5 लाख रुपये बिझनेस प्रमोशन करता देत असल्याची नोंद आधी करण्यात आली होती. ती नोंदनंतर अमित चंडोळेला दरमाह टॉप्स ग्रुपकडून 6 लाख रुपये पगार म्हणून दाखवण्या आली होती.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Tops group case M Shashidharan arrested Enforcement Directorate

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com