मीरा-भाईंद महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ?

मीरा-भाईंद महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ?

मुंबई: आज महापौर आणि उपमहापौरपदांसाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये थेट लढत रंगली आहे. भाजपकडून महापौरपदासाठी ज्योत्स्ना हसनाळे तर  महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे अनंत शिर्के यांनी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपकडून मदन सिंह, तर महाविकास आघाडीकडून मर्लिन डिसा यांनी अर्ज दाखल केले आहेत.

मीरा-भाईंदरचे भाजपचे नेते नरेंद्र मेहता यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता,त्यावरून भाजपमध्ये फुट आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सद्यस्थितीत भाजपकडे ६१ नगरसेवकांचं संख्याबळ आहे तर शिवसेनेकडे २२, कॉंग्रेसकडे १२ नगसेवकांचं बळ आहेत. ४८ हा बहुमताचा आकडा आहे. 

भाजपचं पारडं जरी जड दिसत असलं तरी भाजपमध्ये दोन गट असल्याची चर्चा आहे. एक गट नरेंद्र मेहता यांच्या समर्थक नगरसेवकांचा तर दूसरा गट विद्यमान आमदार गीता जैन यांच्या समर्थक नगरसेवकांचा आहे. त्यामुळे आमदार फुटू नयेत म्हणून भाजपनं आपल्या नगरसेवकांना गोवा इथल्या हॉटेलमध्ये ठेवलं आहे.

शिवसेना-कॉंग्रेसचे नगरसेवक नॉट रीचेबल:
 
महाविकास आघाडी मीरा-भाईंदरमदजे बहुमतापर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्यात कॉंग्रेसचे २ तर शिवसनेचा १ नगरसेवक गायब आहेत. शिवसेनेचे काही नगरसेवक माथेरानमध्ये आहेत. काँग्रेस नगरसेविका सारा अक्रम खान आणि अहमद शेख तर शिवसेनेच्या दीप्ती भट्ट हे नॉट रिचेबल आहेत. "महापौर निवडणुकीत चमत्कार घडवणार," असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. 

या संपूर्ण निवडणुकीवर भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसत असलं तरी गीता जैन यांचा गट महाविकास आघाडीला जाऊन मिळाला तर शिवसेनेचा महापौर होण्याचीही शक्यता आहे. 

Tough Fight between shivsena-BJP  in  Mira-Bhayandar mayor elections 
    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com