हंगाम संपत आला; राज्यातील टूर गाईड रोजगाराविनाच!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोना विषाणूचा `संसर्ग` सर्वात प्रथम पर्यटन व्यवसायावर झाला. फेब्रुवारी ते मे पर्यटनचा हंगाम मानला जातो. मात्र, नेमका त्याच वेळी कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातलाय. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. परिणामी गाईड म्हणून काम करणारे  बेरोजगार झाले आहेत. राज्यभरातील गाईड मंडळींचा आता रोजचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यांना सरकारकडून मदतही मिळत नाहीय आणि ट्रॅव्हल्स एजंटकडे केलेल्या कामाचे पैसेही अडकून पडले आहेत. घरखर्च कसा चालावायचा, घरातील आजारी माणसांच्या उपचारांसाठी पैसे कुठून आणायचे... असा त्यांचा संघर्ष सुरू आहे.

महत्त्वाचे : `वर्क फ्राॅम होम`मुळे दुधाच्या मागणीत दुपटीने वाढ

आता काही दिवसांत पर्यटन हंगाम संपेल. दिवाळी आणि नाताळच्या सुट्टीवरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कमाईसाठी गाईडना आता पुढच्या वर्षीच्या सुट्टीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत दिवस कसे ढकलायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे राज्यभरात एकूण 200 गाईड कार्यरत आहेत. त्या सर्वांवरच बेरोजगार असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात अनेकांच्या घरी अन्नधान्याची चणचण आहे. 

हेही वाचा : दिव्यांगाचे बाणेदार उत्तर... माझ्यापेक्षा गरिबांना मदत करा!

खूपच हाल होताहेत... सरकारने मदत करावी 
औरंगाबादमधील सय्यद शेख (नाव बदलले आहे) सांगतात, गेल्या वर्षीपासून पर्यटन क्षेत्राला ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षी विमान सेवा देणाऱ्या कंपनी बंद पडल्या. आता कोरोनामुळे सर्वच ठप्प आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा आणि वेरूळ पर्यटनस्थळातून  सर्वाधिक नफा मिळतो. उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक भेट देतात. पण, कोरोनामुळे सर्वच रोजगार बुडाला. काहीच काम उरलेले नाही. गाईडव्यतिरिक्त विमान व ट्रेन तिकीट बुकिंगचे कामही करतो, पण आता तेही बंद आहे. आधी मिळालेले पैसे किती दिवस पुरणार? खूपच हाल होत आहेत. सरकारने मदत करावी. 

LockdownSpl. : हे नको-ते नको, मग डान्स करा अन् फिट राहा!

कोणाच्या भरवशावर जगायचे ? 

मुंबई गणेश वाकळे म्हणाले, की लॉकडाऊनपूर्वी ट्रॅव्हल एजंट आणि सरकारच्या 15 ते 16 असाईनमेंट केल्या. परंतु त्याचे मानधन अजून मिळालेले नाही. ट्रॅव्हल एजंट म्हणतात, आम्हाला पैसे मिळाले नाही. वेळ लागेल पैसे यायला. पैसे येतील तेव्हा दिले जातील. केंद्र आणि राज्य सरकारलाही आर्जव केले, पण अजून दोघांकडून कोणतीच मदत मिळाली नाही. माझे बरेचसे ग्राहक परदेशी असतात. परंतु जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे परदेशी पर्यटक सर्व सुरळीत झाल्यावर फिरायला येतील याबाबतही खात्री नाही. लॉकडाऊननंतर सर्व सुरळीत झाले तरी पर्यटन क्षेत्र पूर्ववत व्हायला खूप वेळ लागेल. तोपर्यंत आम्ही कोणाच्या भरवशावर जगायचे?

आर्थिकदृष्ट्या हतबल झालो! 
मुंबईचे गाईड टीमचे प्रमुख फरान शेख म्हणाले, प्रत्येक गाईडची परिस्थिती अतिशय वाईट आहे. मी स्वतः आर्थिकदृष्ट्या हतबल झालो आहे. माझ्या घरात पाच व्यक्ती आहेत. आई-वडिलांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांच्या औषध-पाण्यासाठी पैसे लागतात. घरची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. जमावलेल्या मिळकतीतून किती दिवस घर चालेल याची चिंता आहे. माझ्यापेक्षा काही गाईडच्या घरातील अन्नधान्य संपले. त्यांची उपासमार होत आहे. त्यांचे मदतीसाठी फोन येतात. संपूर्ण हंगाम कोरोनामुळे बरबाद झाला. पर्यटन क्षेत्र पुन्हा कधी सुरळीत होईल, याबाबत कोणतीच शाश्वती नाही. तोपर्यंत आम्ही काय करायचे?

राज्यभरातील गाईडच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मदतीसाठी अहवाल तयार करण्यात आला आहे. तो केंद्र आणि राज्य सरकारच्या पर्यटन विभागाला पाठवला आहे. अहवाल पाठवून 15 दिवसांहून अधिक दिवस झाले, परंतु दोन्ही सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सरकारने आर्थिक मदत करणे अपेक्षित आहे. 
- फरान शेख, एमटीडीसी टूर गाईड प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com