esakal | मरण पाठीवर बांधून ट्रॅकमनचे काम
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

"मरण" पाठीवर बांधून ट्रॅकमनचे काम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ट्रॅकमन (Trackmen) म्हणून रेल्वेत (Railway) कार्यरत असलेल्या गांधळे यांना सकाळी ८ वाजता कर्तव्यावर जावे लागते. यासाठी बदलापूर (Badlapur) येथून सकाळी (Morning) ६.२५ ची सीएसएमटी (CSMT) जलद लोकल पकडतात. पोहोचल्यानंतर दिवसभराच्या कामाचे नियोजन ठरते. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई (Mumbai) विभागात 'ट्रॅकमन 'चे काम जिकिरीचे असते.

रेल्वेच्या इतर विभागांपेक्षा मुंबई विभागात सर्वाधिक गुंतागुंतीचे रेल्वेचे जाळे, असल्याने कोणती गाडी कोणत्या रेल्वे रुळावर येईल, हे समजणे कठीण असते. अनेक वेळा मोटरमन, लोको पायलट यांच्याकडून खूप उशिरा हॉर्न वाजविला जातो. त्यामुळे ट्रॅकमनला गाडी येत असल्याचे समजेपर्यंत गाडी जवळ आलेली असते. अनेक विभागात लोकल, एक्स्प्रेस आली, तर सुरक्षित उभे राहण्यासाठी जागा तयार केलेली असते; परंतु बहुतांश ठिकाणी (सीएसएमटी, मस्जिद) अशी जागाच नाही. त्यामुळे मरण पाठीवर बांधून ट्रॅकमनला काम करावे लागते.

हेही वाचा: रंग माझा वेगळा: दीपा-कार्तिकच्या मुलींचं बारसं

'भगवा' रंग हा शौर्याचे प्रतीक आहे. त्याप्रमाणे ट्रॅकमनच्या गणवेशाचा रंग भगवा असून त्याप्रमाणे मोठ्या शौर्याने, धैर्याने ट्रॅकमन काम करतो. रेल्वेची सेवा सुरळीत सुरू राहावी, यासाठीची जबाबदारी उत्तमपणे पार पाडतो; पण या भगव्या रंगाच्या कपड्यातील माणूस अनेकांकडून दुर्लक्षित राहत असल्याची खंत गांधळे यांनी व्यक्त केली. रेल्वेरुळावर काम करताना लोकल, एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी पायाने छत्रीने ट्रंकमनची टोपी उडविणे, डोक्यावर लाथ मारणे, थुंकणे असे प्रकार करतात.

काही प्रवाशांचा उनाडपणा ट्रॅकमनच्या जीवावरही बेततो. ट्रॅकमनला इतर समस्यांचाही सामना करावा लागतो. सीएसएमटी, मस्जिद, सँडहर्स्ट रोड येथील रुळानजीक राहणाऱ्या रहिवाशांकडून सांडपाणी, घाण टाकली जाते. ही घाण स्वतः हाताने बाजूला काढून काम करावे लागते, असे गांधळे सांगतात. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकमन हा दुर्लक्षित घटक ठरत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

loading image
go to top