

Chunabhatti-Sion Connector Traffic Jam
ESakal
मुंबईतील चुनाभट्टी–सायन कनेक्टर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भीम अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीकडे जात होते. तर या दरम्यान पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मुंबईत रास्तारोको करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अनुयायांनी दादरकडे जाणारा रस्ता रोखून धरला. यामुळे दादरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.