
Traffic Route Change in navratri
ESakal
ठाणे : राज्यभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात सोमवार (ता. २२) पासून सुरुवात होणार आहे. सर्वत्र देवीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु असल्याचे दिसून येत आहे. नवरात्रोत्सवनिमित्त शहरात विविध ठिकाणी गरबा, दांडिया खेळात येतात. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीत बदल केले आहेत. अनेक मार्ग बंद करण्यात आले असून पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.