Mumbai News: हॉर्नचा मोह आवरेना! मुंबईत २१,४९२ चालकांवर कारवाई
Traffic police: वाहनांना चित्रविचित्र, कर्णकर्कश व प्रेशर हॉर्न लावून वाहनांशी छेडछाड करून हॉर्नचा आवाज वाढवतात आणि रस्त्यावर गोंगाट करतात. याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी २१,४९२ चालकांवर कारवाई केली आहे.
मुंबई : अनावश्यक हॉर्न वाजवल्यामुळे ध्वनिप्रदूषण होते आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो; मात्र मुंबईकरांना हॉर्नचा मोह आवरत नाही. याप्रकरणी २०२४ मध्ये वाहतूक पोलिसांनी २१,४९२ चालकांवर कारवाई केली आहे.