
Mumbai-Pune Expressway traffic changes
ESakal
मुंबई : राज्यभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून अनेक प्रमुख देवी मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. लोणावळ्याजवळील वेहेरगाव गडावर असलेल्या कुलस्वामिनी एकविरा देवीच्या दर्शनासाठी देखील पहाटेपासून भक्ताची मांदियाळी जमली आहे. तर पुढील काही दिवसात गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत.