
मुंबई लोकलची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. रेल्वे सेवा तब्बल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रवाशांना घरी जायच्या वेळीच त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रुळावरून पायपीठ करताना चाकरमानी दिसून आले आहेत. या घटनेने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.