मुंबई : राज्य सरकारकडून ई-बाइक टॅक्सी सुरु होणार असल्याची घोषणा झाली आहे. मात्र अद्यापही राज्यभरात बाइक टॅक्सींद्वारे अनधिकृत प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मुंबईतही बाइक टॅक्सी सर्रास धावत असून याप्रकरणी परिवहन विभागाने ५७ बाइक टॅक्सींवर कारवाई केली आहे.