

Traffic Free Ghodbunder Road by January 2026
ESakal
ठाणे : डिसेंबरअखेरपर्यंत सेवा रस्ता विलीनीकरण करून घोडबंदर मार्ग कोंडीमुक्त करण्याचे स्वप्न आणखी दोन महिने पुढे सरकले आहे. गायमुख घाटाचे पुनर्पुष्ठीकरण, घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणच्या वाहिन्यांचे स्थलांतरण ही सर्व कामे पूर्ण होण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे आता नवीन वर्षात जानेवारी २०२६मध्ये घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.