'त्या' प्रवाशांना करा मुंबईतच क्वारंटाईन..राज्य साथरोग नियंत्रण समितीची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

मुंबई: कोरोनाबाधित देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला मुंबईबाहेर जाऊ देऊ नका, अशी शिफारस राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीने राज्य सरकारला केली आहे. मुंबईबाहेरच्या प्रवाशांवर सक्ती न करता त्यांना मुंबईतील रुग्णालयात राहण्याचा, ठरलेल्या हॉटेलमध्ये राहण्याचा अथवा घरी जायचे झाल्यास फक्त खासगी वाहनाने जाण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. 

मुंबई: कोरोनाबाधित देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला मुंबईबाहेर जाऊ देऊ नका, अशी शिफारस राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीने राज्य सरकारला केली आहे. मुंबईबाहेरच्या प्रवाशांवर सक्ती न करता त्यांना मुंबईतील रुग्णालयात राहण्याचा, ठरलेल्या हॉटेलमध्ये राहण्याचा अथवा घरी जायचे झाल्यास फक्त खासगी वाहनाने जाण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. 

परदेशातून आलेल्या आणि "होम क्वारंटाईन'चा शिक्का असलेले सहा प्रवासी आज सौराष्ट्र एक्‍स्प्रेसमध्ये आढळले होते. त्यांना बोरिवली स्थानकावर रेल्वेतून उतरवण्यात आले. या प्रवाशांना रुग्णालयात प्राथमिक तपासणीसाठी पाठविण्यात आले. तसेच बुधवारी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या होम क्वारंटाईन असलेल्या चार प्रवाशांनाही पालघर स्थानकावर उतरवण्यात आले. "होम क्वारंटाईन प्रवासी सहजपणे बाहेर फिरत असल्याने वेगळीच सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. सध्या देशात कोरोनाची भीती वाढल्यामुळे भविष्यात "होम क्वारंटाईन'चा शिक्का असलेल्या प्रवाशांसोबत हिंसक घटनाही घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. हा धोका लक्षात घेउन मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशांना मुंबईतच ठेवा, अशी शिफारस साथरोग नियंत्रण समितीने केली आहे.  

हेही वाचा: वर्क फ्रॉम होम करताय आणि एकीकडे मुलगा रडतोय? 'या' वर्क फ्रॉम होमच्या भारी टिप्स... 

दरम्यान, आखाती देशातून आजपासून मोठ्या प्रमाणात प्रवासी येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 701 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यातील २१ प्रवासी हे "ब' श्रेणीतील म्हणजे त्यांच्यात कोरोनाबाधाची लक्षणे नसली तरी इतर आजार आहेत, त्यांना मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात पाठविण्यात आले; तर ६८० प्रवाशांमध्ये कोणतीही लक्षणे न आढळल्याने त्यांना घरी एकांतात राहण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती महापालिकेच्या उपआरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. 

साथनियंत्रण कायद्यानुसार, महापालिकेला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका प्रत्येक प्रवाशावर निर्बंध आणू शकते; मात्र पालिका अद्याप कठोर भूमिका घेताना दिसत नाही. "शहराबाहेर राहणाऱ्या प्रवाशांना सेव्हन हिल्स रुग्णालयात राहण्याचा किंवा महापालिकेने ठरवून दिलेल्या हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला घरी जायचे असल्यास त्याने खासगी वाहनाने घरी जावे, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

हेही वाचा: ...'हे' घेऊन बाहेर फिरू नका;पोलिस करतील कारवाई 

कोल्हापूरसारखा प्रकार झाल्यास... 

कोल्हापूर येथे आज खोकणाऱ्या व्यक्तीला मास्क लावण्याच सल्ला एका जोडप्याने दिला. त्या व्यक्तीने त्यास नकार दिला. त्यामुळे या जोडप्याने थेट त्या व्यक्तीला मारहाण केली. असा प्रकार मुंबई विमानतळावर उतरून सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणाऱ्याबाबतही होऊ शकतो. 

हेही वाचा: ३१ मार्चपर्यंत मुंबईतील ४ मोठी शहरं राहणार बंद-उद्धव ठाकरे 

का आहेत १४ दिवस महत्त्वाचे? 

कोरोनाच्या विषाणूंची वाढ १४ दिवसांमध्ये होते. म्हणून परदेशातून आलेल्या प्रवाशांना १४ दिवस घरी एकांतात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. 
कोरोनाची बाधा झाल्याची लक्षणे अनेक वेळा उशिराने दिसतात. त्यामुळे विमानतळावरील तपासणीत प्रवाशात प्राथमिक लक्षणे दिसली नाहीत; तरी तो बाधित नसेलच याची १०० टक्के खात्री दिली जात नाही. त्यामुळे प्रवासादरम्यान या प्रवाशांपासून इतरांनाही आजार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाहीत.

travelers  coming from other countries should be quarantine in mumbai read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: travelers coming from other countries should be quarantine in mumbai read full story