esakal | केळवे येथे सुरु झाली वृक्ष दत्तक योजना
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

केळवे येथे सुरु झाली वृक्ष दत्तक योजना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : दिवसेंदिवस समुद्रकिनाऱ्यावर (Sea) मोठ्या प्रमाणात धूप होऊ लागली आहे. धूप रोखण्यासाठी पालघर तालुक्यातील केळवे (Kelwe) येथील नागरिकांनी वेगळी शक्कल लढवत समुद्रकिनारी वृक्ष (Tree) दत्तक योजना राबवली. लोकसहभागातून केळवे (Kelwe) समुद्रकिनाऱ्यावर वननिर्मिती करण्याच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी केळवे पर्यावरण संवर्धन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

‘एक झाड लावूया.. पर्यावरण रक्षुया.. आपल्यासाठी’ या घोषवाक्याने केळवे पर्यावरण संवर्धन मंडळ व ग्रामपंचायत केळवे यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्रफळ आणि कोनोकार्पस या वृक्षांच्या लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. वृक्षारोपणाचा शुभारंभ ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना किणी व केळवे पर्यावरण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

हेही वाचा: मुंबईत डासांचा फैलाव रोखण्यासाठी BMC कडून उपाययोजनांंचा आढावा

५०० रुपयांना झाड

केळवे समुद्रकिनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी ‘मालकीचे एक रोपटे’ या योजनेअंतर्गत प्रति ५०० रुपये एक झाड देण्यात आले. या संकल्पनेला अनेक दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. किनाऱ्यावरील झाडांचे संगोपन करण्याची हमी केळवे पर्यावरण संवर्धन मंडळाने घेतली आहे. वृक्षांच्या रक्षणासाठी राष्ट्रीय सेवा योजना दांडेकर महाविद्यालय आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तसेच स्वयंसेवक संत निरंकारी मंडळ स्वयंसेवक, केळवे गावातील स्वयंसेवकांची मदत होणार आहे.

loading image
go to top