Metro Work : मेट्रोच्या कामामुळे मंत्रालयात हादरे; खिडकीच्या फुटल्या काचा

मेट्रो ३ भुयारी मार्गातील मंत्रालय आवारातील कामादरम्यान खोदकामाच्या स्फोटामुळे मंत्री सुधीर मुनगंटीवार दालनातील खिडकीच्या काचा फुटल्या.
Window Glass Broken
Window Glass BrokenSakal

मुंबई - मेट्रो ३ भुयारी मार्गातील मंत्रालय आवारातील कामादरम्यान खोदकामाच्या स्फोटामुळे मंत्री सुधीर मुनगंटीवार दालनातील खिडकीच्या काचा फुटल्या. गेल्या काही वर्षापासून मंत्रालयाच्या बाजूला भुयारी मेट्रोचे काम सुरु आहे. मात्र असा प्रकार पहिल्यांदाच पाहील्याचे इथल्या अधिकाऱ्यांनी 'सकाळ'सोबत बोलताना सांगितले.

या घटनेची सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीर दखल घेतली. एमएमआरडीएला पत्र लिहून अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी तातडीने उपायोयजना करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कुलाबा ते सिप्झ या भूमिगत मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. मंत्रालय ते विधानभवन भुयारी मार्गाच्या प्रवेश/निकसाचे खोदकाम सुरू असून या कामादरम्यान कठीण खडक फोडण्यासाठी नियंत्रित ब्लास्टिंग केले जात आहे.

काही दिवसांपासून ब्लास्टिंगचे काम कोणत्याही अडचणीशिवाय सुरू आहे. मात्र गुरुवार ता.३१ रोजी या स्फोटादरम्यान झालेल्या हादऱ्यामुळे जुने मंत्रालय इमारतीतील वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनातील खिडकीच्या काचा फुटल्या. मंत्रालयातील जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यालय आहे. दुपारी दोनच्या सुमारास एक दगड उडून खिडकीवर लागला.

त्यात बैठक कक्षातील खिडकीच्या संपुर्ण काचा फूटल्या. यामुळे या कार्यालयात काचांचा खच पडला होता. यावेळी बैठक कक्षात लोक होते. मात्र कुणालाच इजा झाली नसल्याचे कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यालयाच्या खाली पार्कींगमध्ये उभी असलेल्या एका गाडीच्या काचाही या हादऱ्यांमुळे फुटल्या आहे.

यापूर्वीही भूमिगत कामाला विरोध

यापुर्वी अनेक राहीवाशांनी हादरे बसण्याच्या तक्रारी केल्या आहेत. गिरगावच्या एका नामांकित इमारतीने याकामाला विरोध दर्शविला होता. शिवाय फोर्ट भागात सिध्दार्थ कॉलेज ते इतर इमारतींंना तडे जाण्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे गुरुवारी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.

आम्ही खात्री देतो की, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) आपले काम पूर्ण जबाबदारीने करीत आहे. सध्या आम्ही मंत्रालयाजवळील भुयारी मार्गावर नियंत्रित ब्लास्टिंगचे काम थांबवित आहोत. या कामाचा आढावा घेतला जाईल. ब्लास्टिंगदरम्यान झालेल्या घटनेच्या कारणांचा अभ्यास करून सुधारणेनंतरच काम पुन्हा सुरू केले जाईल.

- प्रवक्ते, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com