येत्या जानेवारीत मेट्रो-2 अ आणि मेट्रो- 7चे ट्रायल रन्स होणार सुरु

येत्या जानेवारीत मेट्रो-2 अ आणि मेट्रो- 7चे ट्रायल रन्स होणार सुरु

मुंबई:  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून काम सुरु असलेल्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या ट्रायल जानेवारी महिन्यात सुरु होणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्षात मे महिन्यात या दोन्ही मार्गांवरील मेट्रो प्रवाशांना घेऊन धावणार आहेत. 

मेट्रो कामांचा समन्वय करण्यासाठी चारकोप येथे मेट्रो डेपो नुकताच खुले करण्यात आले आहे. याठिकाणी मेट्रो चाचण्यांचे सनियंत्रण करणे तसेच मेट्रो कोचच्या मेंटेनन्स शेड देखील हे कार्यालय काम करेल. या कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या आले होते. यावेळी मेट्रोच्या ट्रायल रन्स लवकर सुरु होतील, असे ते म्हणाले. 

मेट्रोच्या चाचण्या यशस्वी करण्याबरोबरच नागरिकांना सुनिश्चितच मेट्रो प्रवासाचा अनुभव देण्यासाठी अधिकारी एकत्रितरित्या प्रयत्न करणार आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ सुरु करण्याचा प्रकल्प रखडला. दरम्यान, आता जानेवारी महिन्यात मेट्रोच्या ट्रायल सुरु होतील. 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबईच्या उपनगरात वेगाने मेट्रोची कामे सुरु असून, मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ हे दोन्ही मेट्रो प्रकल्प येत्या काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेषत: हे दोन्ही मेट्रो प्रकल्प वेगाने पूर्ण होत असतानाच येथील मेट्रोच्या ट्रायल रन्स देखील आता लवकरच सुरु होतील, असे सुतोवाच प्राधिकरणाने केले आहे.

-----------------

(संपादन- पूजा विचारे)

Trial runs Metro 2A Metro 7 will start January

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com