

Monkeys At Raj Thackeray Residence
ESakal
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी माकडांचा एक कळप घुसला. माकडांच्या अचानक प्रवेशामुळे घबराट पसरली. घरात माकडांना पाहून कुटुंबीय आणि कर्मचारी घाबरले. यानंतर तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. हे प्रकरण गंभीर मानून पोलिसांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि या वन्य प्राण्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत मागितली.