esakal | क्षयरोगावरील नवीन औषध रुग्णांसाठी गुणकारी; 33 रुग्णांवरील चाचणी सकारात्मक
sakal

बोलून बातमी शोधा

Tuberculosis

क्षयरोगावरील नवीन औषध रुग्णांसाठी गुणकारी; 33 रुग्णांवरील चाचणी सकारात्मक

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : क्षयरोगावर (Tuberculosis) कमी वेळात नियंत्रण मिळवणे शक्य होणार असून रुग्णांवरील नवीन औषधांच्या चाचण्या (New patent test) सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. शिवडी (Sewri hospital) येथील क्षयरोग रुग्णालयात 33 रुग्णांवर या नवीन औषधांची चाचणी सुरू आहे. या चाचणीत या औषधांचे परिणाम (Good impact) चांगले दिसत असून ही औषधे क्षयरोग्यांसाठी दिलासादायक ठरली असल्याचे महापालिका (BMC) आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दक्षता शाह (Dr dakshata Shah) यांनी सांगितले.

हेही वाचा: गणरायाला आकर्षक फेटा परिधान करण्याचा ट्रेंड वाढला

आयसीएमारच्या अंतर्गत एनआयआरटी चेन्नई आणि क्षयरोग रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोगावरील नवीन औषधांची चाचणी सुरू करण्यात आली. बेडाक्युलीन, डेटामनिया, लायनेझोलीड आणि क्लोफाझीमाईन अशी या चार औषधांची नावे आहेत. देशभरातील काही रुग्णालयांतील क्षयरोग्यांवर या औषधांची चाचणी केली जात असून पालिकेचे क्षयरोग रुग्णालय हे त्यांपैकी एक आहे.

क्षयरोग रुग्णालयात 2018 मध्ये या चाचणीला सुरुवात झाली. रुग्णालयातील 33 रुग्णांवर या औषधांची चाचणी सुरू आहे. या रुग्णांवर सहा महिने उपचार केल्या नंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून ते सध्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली आहेत.त्यांच्यावरील ही चाचणी सलग सलग तीन वर्षे सुरू राहणार असून जून 2022 मध्ये या औषधांचा आणि त्यांच्या परिणामांचा रिव्ह्यू घेण्यात येणार आहे असे क्षयरोग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नम्रता कौर यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 354 नव्या रुग्णांची भर; 7 जणांचा मृत्यू

आतापर्यंत करण्यात आलेल्या निरीक्षणात हे औषध घेणाऱ्या रुग्णांचा बरे होण्याचा दर अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. एमडीआर रुग्णांमध्ये जुन्या औषधांच्या तूलनेत ही औषध अधिक गुणकारी असल्याचे ही त्यांनी सांगितले. क्षयरोगावरील उपचारांच्या नवीन प्रोटोकॉल नुसार या औषधांचा सर्वसाधारण रुग्णांना देखील लाभ होत असून यातील बेडाक्युलीन हे औषध रुग्णांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हे औषध घेणाऱ्या रुग्णाची दर महिन्याला आरोग्य तपासणी करून नोंद केली जाते अशी माहिती डॉ. दक्षता शाह यांनी दिली.

नवीन चार औषध रुग्णाला दिली गेली. साधारणता 6 महिने औषध दिल्यानंतर पुढील एक वर्ष त्या रुग्णांचे निरीक्षण केले जात आहे. यासाठी त्या रुग्णाची क्लीनिकल, बायोलॉजिकल, बॅक्ट्रोलॉजिकल आणि एक्सपेरिमेंटल चाचणी केली जाते. त्यातून रुग्णांवर होणारा औषधांचा परिणाम तपासला जातो.

आतापर्यंतची निरीक्षणे

-रिकव्हरी रेट चांगला

-लक्षणे कमी होण्यास मदत

-रुग्णांचे वजन वाढले

-संसर्ग कमी झाला

loading image
go to top