

Tukaram Mundhe
ESakal
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंत्रालय, विधान भवन येथील तीन उपाहारगृहे ९८ टक्के स्वच्छ असल्याचा दिलेला अहवाल वकिलांच्या समितीने केलेल्या तपासणीनंतर खोटा असल्याचे उघड झाले. त्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. ३१) घेतली आणि मुंबईतील खासगी उपाहारगृहे आणि हॉटेल्सविरुद्ध केलेल्या पक्षपाती कारवाईबद्दल जाबही विचारला. तसेच अन्य उपाहारगृहे आणि हॉटेल्सप्रमाणे मंत्रालयातील उपाहारगृहांनाही स्थिती सुधारण्याबाबत नोटीस बजावण्याचे आदेश एफडीएला दिले.