

Tukaram Mundhe Transfer News Narhari Zirwal statement
esakal
FDA Commissioner Maharashtra : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवायांची दखल घेत विधानसभेत बुधवारी सर्वपक्षीय सदस्य एकवटले. भेसळखोर आणि अवैध व्यावसायिकांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेमुळे एफडीए विभाग चर्चेत आला असून, मुंढे यांच्या कामाचे सदस्यांनी तोंडभरून कौतुक केले. त्याचबरोबर त्यांच्या बदलीच्या चर्चांना पूर्णविराम देत किमान तीन वर्षे त्यांची बदली करू नये, अशी आग्रही मागणीही करण्यात आली.