Tukaram Mundhe
sakal
मुंबई: ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न देण्याबाबत राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहे, रेस्टॉरंट्स, कॅन्टीन, केटरिंग सेवा, बेकरी, मिठाई दुकाने, क्लाउड किचन्स तसेच ऑनलाइन अन्न वितरणाशी संबंधित सर्व व्यवसायांना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक आदेश दिले आहेत. शिवाय ग्राहकांना मोफत सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली आहे.