Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर पुन्हा मोठी दुर्घटना! मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Pandavkada Waterfall Tragedy: खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
खारघर : खारघर येथील पांडवकडा धबधब्यात बुडून एका २३ वर्षीय तरुणाचा आज दुपारी मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव आदित्य विश्वकर्मा असे असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.