2019 मध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात अशीही होती स्पर्धा..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 December 2019

 • ट्विटर ने जारी केलेत 2019 चे आकडे 
 • नरेंद्र मोदी ट्विटरवरील एक नंबर नेता  
 • राहुल गांधी 2 नंबरवर तर अमित शाह 3 वर 
 • स्मृती इराणी यांचा महिलांमध्ये पहिला नंबर 

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने 2019 ची सर्वात जास्त चर्चेत असलेल्या राजकीय व्यक्ती आणि मुद्द्यांची यादी जाहीर केलीये. यामध्ये भारतातील राजकीय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा बाजी मारलीये. ट्विटरने प्रकाशित केलेल्या यादीत मोदी यांचा पहिला नंबर आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी दुसऱ्या नंबरवर तर देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा तिसरा नंबर आहे. महिलांच्या यादीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पहिला नंबर लागलाय. 2019 लोकसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटला ‘गोल्डन ट्वीट ऑफ द ईयर’चा मान मिळालाय.     

महत्त्वाची बातमी : 'कॅब'बद्दल स्पष्टता हवी, आंधळेपणाने समर्थन नाही - उद्धव ठाकरे

2019 हे निवडणुकांचं वर्ष होतं. अशातच भाजपकडून पुन्हा एकदा मोदीच देशाचे पंतप्रधान असतील, या मुद्द्यावर भाजपकडून निवडणुका लढवण्यात आल्यात. साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2019 मध्ये सर्वात जास्त बोलबाला राहिला. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राफेल मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोशल मीडियामध्ये राहुल गांधी देखील प्रचंड चर्चेत राहिलेत.          

2019 मधील ट्विटरवरील सर्वात हिट नेते 

 1. नरेंद्र मोदी
 2. राहुल गांधी
 3. अमित शाह
 4. अरविंद केजरीवाल
 5. योगी आदित्यनाथ

 

महिलांबद्दल बोलायचं झालं तर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा महिला नेत्यांमध्ये पहिला नंबर लागलाय. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना अमेठीमधून पराभूत केलं. त्यामुळे स्मृती इराणी सर्वात जास्त चर्चेतील महिला ठरल्यात. तर दुसऱ्या नंबरवर राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका गांधी वाड्रा यांचा नंबर लागलाय    

हेही वाचा :  एका उंदरासाठी खर्च केले तब्बल 2 हजार 800 रुपये, बातमी वाचाल तर चक्रावून जाल..
 

2019 मधील ट्विटरवरील सर्वात हिट नेत्या

 1. स्मृती इराणी 
 2. प्रियंका गांधी वाड्रा
 3. सुषमा स्वराज
 4. निर्मला सीतारमण
 5. ममता बनर्जी

या यादीत देशाच्या दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा तिसरा क्रमांक आहे. या मागोमाग निर्मला सीतारमण आणि ममता बनर्जी आहेत. 

गोल्डन ट्विट बद्दल बोलल्याचं झालं तर 23मे रोजी लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ असं ट्विट केलं होतं. हे ट्विट वर्षातील एक नंबरचं ट्विट ठरलंय. नरेंद्र मोदी यांचं हे ट्विट 1 लाख 17 हजार वेळा रीट्विट  केलं गेलंय. 

WebTitle : twitter india releases list of top politics handles of india


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter india releases list of top politics handles of india