esakal | 'कॅब'बद्दल स्पष्टता हवी, आंधळेपणाने समर्थन नाही - उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

'कॅब'बद्दल स्पष्टता हवी, आंधळेपणाने समर्थन नाही - उद्धव ठाकरे

'कॅब'बद्दल स्पष्टता हवी, आंधळेपणाने समर्थन नाही - उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मौन सोडलंय. काल लोकसभेत सुधारित नागरिकत्त्व विधेयक पास करण्यात आलं. यानंतर आता राज्यसभेच्या पटलावर हे विधेयक मांडले जाणार आहे. अशातच महाराष्ट्रातील भाजपचे पूर्वीचे साथीदार राहलेली शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. 

'नागरिकत्व कायद्याबाबत स्पष्टता नाही'. जोपर्यंत सर्व बाबींवर स्पष्टता येत नाही, तोपर्यंत या विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचं खुद्द उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं. सुधारित नागरिकत्त्व विधेयकाला आंधळेपणाने समर्थन  देणार नाही असं उद्धव ठाकरे यानी स्पष्ट केलंय.   

महत्त्वाची बातमी :  उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय सांगेन : खडसे
 

काय म्हणालेत उद्धव ठाकरे ? 

"कुणाला बरं वाटावं किंवा वाईट वाटावं म्हणून शिवसेना कधीच भूमिका घेत आलेली नाही. भारतीय जनता पक्ष जे करेल ते देशहित किंवा त्याला जे विरोध करतील तो देशद्रोह, या भ्रमातून आपण बाहेर यायला पाहिजे. देशाच्या भवितव्याचा यामध्ये प्रश्न निर्माण केला जात असेल तर यामध्ये अधिक विस्ताराने, अधिक व्यापकतेने चर्चा होणं गरजेचं आहे. असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. "माझ्या सर्व लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांकडून मी याबद्दलची माहिती घेतोय. प्रत्येकाने विचारलेल्या प्रश्नाची समर्पक उत्तरं मिळत नाही तोपर्यंत याबाबत याला भूमिका घेणार नाही", असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेत. 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक उद्या राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. तब्बल बारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालंय. 311 विरुद्ध 80 मतांनी हे विधेयक मंजूर झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सुमारे एक तास तपशीलवार भाषण केले. विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढत हे विधेयक देशातील अल्पसंख्याकांविरुद्ध नसल्याचे शहा यांनी ठासून सांगितले. शहा यांच्या उत्तरानंतर विधेयकावर मतदान घेण्यात आलं. मात्र राज्यसभेत हे विधेयक पास करण्यासाठीचं संख्याबळ भाजपकडे नाही. अशात उद्धव ठाकरे यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मनाला जातोय. 

महत्त्वाची बातमी :  नाथाभाऊंची अवहेलना आम्हाला आवडली नाही : बाळासाहेब थोरात

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकाचे देशातच नव्हे परदेशातही पडसाद उमटताना दिसतायत. भारतात हे विधेयक लागू झाल्यास अमेरिकेत अमित शहांवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा एका उंदरासाठी खर्च केले तब्बल 2 हजार 800 रुपये,बातमी वाचाल तर चक्रावून जाल..

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर, आसाममध्ये बंद पुकारण्यात आलाय. नागरिकत्व विधेयका विरोदात इथल्या 16 संघटनांनी 12 तासांचा कडकडीत बंद पुकारलाय. तर आसामच्या जोराबाट आणि दिबुगडमध्ये रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आलाय. इतर देशातून आलेल्यांना नागरिकत्व मिळाल्यास आमची ओळख आणि उदरनिर्वाहाला धोका असल्याचं ईशान्येकडील लोकांचं म्हणणं आहे.

WebTitle : uddhav thackeray clears shivsenas stand on Citizenship Amendment Bill

loading image