वंदे भारत! दोन आठवड्यात तब्बल 'इतके' भारतीय परदेशातून मुंबईत दाखल

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 24 मे 2020

  • परदेशांतून अडीच हजार भारतीय दोन आठवड्यांत मुंबईत दाखल
  • एकाही व्यक्तीमध्ये फ्लूसदृश लक्षणे नाहीत; वेगवेगळ्या हॉटेलांत क्वारंटाईन

 
मुंबई: वंदे भारत अभियानांतर्गत 10 मेपासून मुंबई विमानतळावर 2423 प्रवासी उतरले आहेत. त्यापैकी एकाही प्रवाशात फ्लूसदृश लक्षणे आढळली नाहीत. एकूण 1127 प्रवाशांना मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्यात परराज्यांतील 378 प्रवाशांचा समावेश आहे. या सर्व प्रवाशांना 14 दिवस हॉटेलात राहिल्यानंतर पुढील 14 दिवस घरात एकांतात राहावे लागेल.

विद्यार्थ्यांचं करिअर बद्दलचं कन्फ्युजन मिटवण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’ लॉन्च...

परदेशांत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत अभियान सुरू केले असून, आतापर्यंत 17 विमाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली आहेत. त्याचप्रमाणे 7 जूनपर्यंत आणखी 13 विमाने मुंबईत येणार असून, जाकार्ता, जोहान्सबर्ग, लंडन, मनिला, टोकियो, कोलंबो, मॉरिशस, नैरोबी आदी ठिकाणांहून भारतीय नागरिक परतणार आहेत. 
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार मुंबईबाहेरील प्रवाशांना मूळ ठिकाणी पाठवून स्थानिक प्रशासनाला माहिती द्यायची होती. सध्या मुंबईचे रहिवासी असलेल्या 906 जणांसह परराज्यांतील 378 प्रवाशांना मुंबईचत क्वारंटाईन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 1139 प्रवाशांना त्यांच्या जिल्ह्यांत पाठवण्यात आले आहे. महापालिका आणि राज्य सरकारचे 65 कर्मचारी विमानतळावर कर्तव्य बजावत आहेत.

योगी आदित्यनाथ यांना आलेली जीवे मारण्याची धमकी आणि त्याचं मुंबई कनेक्शन, मुंबईतून झाली अटक...

मायदेशी आलेले प्रवासी
10  मे : लंडन - 326, सिंगापूर - 243, मनिला -150
11 मे : सॅनफ्रान्सिको - 107, ढाका - 107
12 मे : न्यू यॉर्क - 208, क्वालालम्पूर - 201
13  मे : शिकागो - 195, लंडन येथून - 327, कुवेत - 2 
17 मे : आदिस अबाबा - 78, काबूल - 12
18 मे : मस्कत - 16
19 मे : मनिला - 41
20 मे : मनिला - 29
21 मे : जकार्ता - 185
22 मे : जोहान्सबर्ग -196


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two and a half thousand Indians from abroad arrived in Mumbai in two weeks