esakal | उच्चभू वसाहतीत कोकेनची विक्री दोघांना अटक; एक विदेशी नागरिक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

उच्चभू वसाहतीत कोकेनची विक्री दोघांना अटक; एक विदेशी नागरिक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : शहरातील उच्चभू वसाहतीत कोकेनची विक्री करणाऱ्‍या दोघांना वांद्रे युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्‍यांनी अटक केली. त्यात एका विदेशी नागरिकाचा समावेश असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलिस (Police) कोठडी सुनावली आहे. मोहम्मद नौमान शाहिद कुरेशी आणि याकूब माचो नागानिला ऊर्फ मशाका अशी या दोघांची नावे आहेत.

हेही वाचा: छोटा राजनच्या 'त्या' धमकीला भीकही घालत नाही - आ. कांदे

यातील मोहम्मद नौमान हा पत्रकार असून मशाका हा टांझानियाचा नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी २७ सप्टेंबरला वांद्रे युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय चव्हाण हे त्यांच्या पथकासह वांद्रे येथील बीकेसी, टाटा वसाहत रोडवरील वाधवान कंस्ट्रक्शन गेटसमोर गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना पाहताच एक तरुण पळू लागला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १०५ ग्रॅम वजनाचे कोकेन आणि दोन लाख दहा हजार रुपयांची कॅश सापडली. चौकशीत त्याला ते कोकेन टांझानिया नागरिक असलेला मशाका याने दिल्याचे उघडकीस आले. मग त्यालाही अटक केली. त्याच्याकडून ३६ लाख रुपयांचे १२० ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले.

loading image
go to top