Mumbai News : प्रयोगशाळेत भाजून वरळीत दोघांचा मृत्यू; चौकशी अंती गुन्हा दाखल

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात वरळी येथील प्रसिद्ध सासमिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ॲण्ड टेक्स्टाइल संस्थेच्या प्रयोगशाळेत भाजून 2 महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
fire
fireSakal

मुंबई - गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात वरळी येथील प्रसिद्ध सासमिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ॲण्ड टेक्स्टाइल संस्थेच्या प्रयोगशाळेत भाजून 2 महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर चौकशीअंती वरळी पोलिसांनी शुक्रवारी प्रयोगशाळा प्रभारी लीना म्हात्रेविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला.या प्रकरणी अद्याप लीना म्हात्रेना पोलिसांनी अटक केलेली नाही.

16 नोव्हेंबर, 2022 रोजी वरळी येथील प्रसिद्ध सासमिरा महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत ग्लिसरीन डाईंग मशीनमधून गरम ग्लिसरीन बाहेर पडले होते. त्यामुळे श्रद्धा शिंदे व प्रतीक्षा घुमे या दोघी गंभीर भाजल्या होत्या.

याप्रकरणानंतर जखमींना उपचारासाठी ऐरोली येथील बर्न रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रयोगशाळा प्रभारी लीना म्हात्रे यांच्याविरोधात शुक्रवारी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सुरक्षा उपकरणे उपलब्ध असूनही ती परिधान न करता कर्मचारी प्रयोगशाळेत गेले होते. प्रभारी म्हणून सुरक्षेची पाहणी करण्याची जबाबदारी म्हात्रे यांच्यावर होती. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले. या प्रकरणी येत्या काळात वरळी पोलीस प्रयोगशाळा प्रभारी म्हात्रे याना अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com