Mumbai Crime : वांद्र्याच्या पबमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; 7 जणांना अटक

वांद्रे पश्चिम परिसरातील एका पबच्या सहा बाऊन्सरसह सात कर्मचाऱ्यांना काही वादातून ग्राहकांना मारहाण केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अटक केली.
crime news
crime newsesakal

मुंबई - वांद्रे पश्चिम परिसरातील एका पबच्या सहा बाऊन्सरसह सात कर्मचाऱ्यांना काही वादातून ग्राहकांना मारहाण केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात पबचे कर्मचारी ग्राहकांशी मारहाण करताना दिसत आहे.

वांद्रे पश्चिमयेथील एस्कोबार क्लबमध्ये शनिवारी पहाटे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लबमध्ये दोन गट पार्टी करण्यासाठी आले होते. शॅम्पेन ड्रिंक टाकण्यावरून दोन गटातील सदस्यांमध्ये भांडण झाले.

जोरदार वादानंतर प्रकरण जवळपास मिटले असताना, क्लबमधील बाऊन्सर्सचा एक समूह घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी काही ग्राहकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.बाऊन्सर्सनी या ग्राहकांना धक्काबुक्की करत मारहाण केली. एका ग्राहकाचा लिफ्टपर्यंत पाठलाग करत बाऊंसरने त्याला लिफ्टमध्ये धक्का मारला.

crime news
Mumbai News : ड्रेनेज लेनची सफाई करताना गोवंडीत दोन कामगारांचा मृत्यू

एका बाऊन्सरने ग्राहकाला मारहाण करण्यासाठी धातूच्या रॉडचा वापर केला. क्लबच्या इतर कर्मचाऱ्यांनी बाऊन्सर्सना थांबवले आणि नंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तपास केल्यानंतर पबच्या आरोपी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

'जखमी ग्राहकाच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला असून सहा बाऊन्सरसह सात जणांना अटक केली आहे. आम्ही साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून तपास सुरू आहे.'

- कृष्णकांत उपाध्याय, पोलिस उप आयुक्त, झोन 9.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com