esakal | जॉर्जियात अडकले महाराष्ट्रातील दोनशे विद्यार्थी
sakal

बोलून बातमी शोधा

जॉर्जियात राज्यातील दोनशे विद्यार्थी अडकले

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जॉर्जिया देशात अघोषित बंदी घालण्यात आली असून, तेथील विमानसेवादेखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी जॉर्जियातील टिबिलिसी शहरात गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत.

जॉर्जियात अडकले महाराष्ट्रातील दोनशे विद्यार्थी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जॉर्जिया देशात अघोषित बंदी घालण्यात आली असून, तेथील विमानसेवादेखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी जॉर्जियातील टिबिलिसी शहरात गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. विमानसेवा बंद करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांचे मायदेशी परतण्याचे सर्व मार्गदेखील बंद झाले असून, त्यांची त्या ठिकाणी मोठी गैरसोय होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तत्काळ मायदेशी आणण्यासाठी कारवाई करण्याची मागणी पालक व विद्यार्थी वर्गाकडून होत आहे.

ही बातमी वाचली का? 'जनता कर्फ्यू'च्या आदल्या दिवशी ठाण्यातील बाजारात तुडुंब गर्दी 
 
कोरोना विषाणूने जगातील 172 देशांत थैमान घातले आहे. जॉर्जिया या देशातदेखील 47 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, 1900 नागरिक कॉरन्टाईनमध्ये; तर 300 नागरिकांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत; मात्र याच जॉर्जियातील टिबिलिसी शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. जॉर्जियातील हवामानात बदल झाल्याने त्या ठिकाणी बर्फ पडत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अघोषित बंदी घालण्यात आली आहे. परिणामी, तेथील विमानसेवादेखील पूर्णत: बंद करण्यात आली असल्याने या विद्यार्थ्यांचे मायदेशी परतण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांमुळे कोरोना विषाणू पसरत असल्याचा जॉर्जिया देशातील नागरिकांचा समज झाल्याने त्या ठिकाणी असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत नसल्याचे त्या ठिकाणी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. शहरातील सर्व मॉल, हॉटेल्स बंद असल्याने या विद्यार्थ्यांचे खाणे-पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांमध्ये घबराट परसली आहे. या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालय व विदेश मंत्रालयाशी संपर्क साधून मायदेशी परण्यासाठी मदत करण्याची मागणी केली आहे. 

ही बातमी वाचली का?  भीतीचे कारण नाही; एपीएमसीत आहे... या जीवनावश्यक साधनांचा मुबलक साठा

पत्रव्यवहार सुरू
याबाबत अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शुक्रवारी (ता. 20) पत्रव्यवहार केला; तर काही पालकांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी ट्विटरच्या माध्यमातून संपर्क साधून विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी मदत करण्याची मागणी केली आहे. खासदार सुळे यांनी याची दखल घेऊन तत्काळ विदेश मंत्रालयाशी संपर्क साधून जॉर्जिया देशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

loading image