Mumbai News : अग्निशमन दलाच्या ताफ्यात नव्या वर्षात दोन रोबो होणार दाखल; आगीत उडी घेऊन....

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात पाच वर्षापूर्वी अत्याधुनिक रोबो दाखल झाले होते. त्यानंतर आता नवीन वर्षात मार्च महिन्यांत आणखी दोन अत्याधुनिक रोबो दाखल होणार आहेत.
Mumbai Fire Brigade
Mumbai Fire Brigadesakal

मुंबई - मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात पाच वर्षापूर्वी अत्याधुनिक रोबो दाखल झाले होते. त्यानंतर आता नवीन वर्षात मार्च महिन्यांत आणखी दोन अत्याधुनिक रोबो दाखल होणार आहेत. हे दोन्ही रोबो फ्रान्सवरून खरेदी केले जाणार असून दोन्ही रोबोसह व्हेईलकलसाठी साडेसात कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. बॅटरीवर चालणारे हे रोबो आगीत शिरून आग विझवू शकतात.

शहर आणि उपनगरात आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन अग्निशमन दल आणखी बळकट करण्याच्यादृष्टीने पालिकेने पावले उचलली असून अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करण्यावर भर दिला आहे. सध्या अग्निशमन दलात डिजिटल मोबाइल रेडिओ प्रणाली, आग विझविण्यासाठी रोबो व ९० मीटरपर्यंत उंचीचे टर्न लॅडर, आरटीक्युलेटेड वॉटर टॉवर हॅजमेट यासह विविध अत्याधुनिक यंत्रणा आहे. अग्निशमन दल हे देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीने अव्वल आहे. अग्निशमन दलाने परदेशातही आपत्कालीन परिस्थितीत काम केले आहे.

मुंबईत उत्तुंग इमारतींना लागणा-या आगी विझवितांना अडचणींना सामोरे जावे लागते. आता दलाच्या ताफ्यात आणखी दोन अत्याधुनिक रोबो दलाच्या मदतीसाठी य़ेणार आहेत. हे रोबो फ्रान्सवरून आणले जाणार आहेत. आवश्यक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.

त्यामुळे नवीन वर्षात मार्च महिन्याच्या अखेरीस हे रोबो अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. हे रोबो आगीच्या ज्वाळा, चिंचोळ्या गल्ल्या अशा ठिकाणी सहज जाऊन तिथली आग विजवू शकणार आहेत.

दोन्ही रोबोची किंमत साडेसात कोटी रुपये असणार आहे. रोबोतील थर्मल कॅमेरा धुरातही सर्व स्पष्टपणे दाखवेल. रोबो बॅटरीवर चालणारे असून ही बॅटरी चार तास चालते. मात्र ती संपल्यावर तात्काळ दुसरी बॅटरी जोडता येणार असल्याने रोबोला कितीही तास आगीशी झुंज देता येणार आहे.

सध्या ईस्त्रायल, चीन, अमेरिका असे रोबो तयार करते. विमान बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम पत्र्याच्या सहाय्याने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. फ्रान्सच्या कंपनीने तयार केलेला हा रोबो सुमारे ५५ मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करू शकतो.

बेसमेंटवरून राहून आगीशी सामना करतानाच पसरलेल्या धुरातही जीन्यावरून वर इमारतीत शिरून रोबो आग विजवू शकणार आहेत. कॅमेरा बसविण्यात आला असल्याने घटनास्थळाचाही अंदाज घेता येणार आहे.

बॅटरीवर चालणार रोबो

आगीचा भडका उडाल्यानंतर प्रचंड उष्णतेमुळे जवान या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. मात्र अग्निशमन दलात दाखल होणारे हे दोन रोबो आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ, चिंचोळय़ा गल्ल्या, बेसमेंटची आग अशा ठिकाणी थेट जाऊन आगीवर नियंत्रण मिळवू शकणार आहे.

बॅटरीवर चालणारे हे रोबो असल्याने अचानक बॅटरी संपल्यास तात्काळ दुसरी बॅचरी जोडता येणार आहे. त्यामुळे रोबोला सलग आगीशी सामना करता येणार आहे. रोबो अडगळीच्या ठिकाणी जाऊनही आग विझवू शकणार असल्यामुळे आग भडकण्याचे प्रमाण कमी होणार असल्याची माहिती अग्निशमन दलातून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com