esakal | मुंबईत आले दोन नवे पाहूणे
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबईत आले दोन नवे पाहूणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भायखळा (Byculla) येथील विरमाता जिजाबाई भोसले उद्यानात दोन पेग्विनचा (penguin) जन्म झाला आहे. 1 मे रोजी पहिले बाळ अड्ड्यांतून बाहेर आले आहे. या पेंग्विनचे नामकरण ओरिओ (Oreo) असे करण्यात आले आहे. तर,दुसरा पेंग्विन 19 ऑगस्ट रोजी अंड्यातून बाहेर आले आहे. त्याची अद्याप लिंग तपासणी झालेली नसल्याने नामरकरण करण्यात आलेले आहे. ओरीओ बबल या मादीसोबत सोबत राहात आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परीषदेत पेंग्विनच्या जन्माची माहिती दिली. ओरीओ पेंग्विन आता साडे तीन महिन्याचा झालेला असून तो इतर पेग्विन बरोबर बागडूही लागला आहे.त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे प्राणीसंग्रहालया कडून सांगण्यात आले.सध्या हा पेंग्विन किशोरावस्थेत असून वर्षाभरात तो प्रौढावस्थेत दाखल होईल.ओरीओ सुरवातीच्या काळात डॉक्टरांच्या सतत निगरणाी खाली होता.सुरवातील डोनाल्ड आणि डेसी या पालकां बरोबर त्याला घरट्यात वेगळे ठेवण्यात आले होते.डॉक्टरांची टिम दर दोन तासांनी पालकांना आहार पुरवात होती.तसेच,रोज सकाळी पिल्लाचे वजन करुन त्याच्या आहाराबाबत निर्णय घेतला जात होता.आता हा पेग्विन इतर पक्षां बरोबरच राहात आहे.तसेच,तो प्रौढ पेंग्विन प्रमाणे मासे आणि इतर आहार घेत आहे.तसेच तो जास्तीत जास्त वेळ बबल या मादीसोबत राहात आहे.

पेंग्विनची देखभाल करणाऱ्या डॉक्टरांनीच ओरीओ हे नाव दिले असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे अधिक्षक डॉ.संजय त्रिपाठी यांनी सांगितले. किशोरावस्थेतून प्रौढावस्थेत येण्याची प्रक्रिया पेंग्विनसाठी खुप तणाव पुर्वक असते.त्यासाठीही काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.पेंग्विनवरुन कितीही राजकरण केले जात असले तरी हे पेंग्विन आता मुंबईचे ओळख झाली आहे.त्यांची काळजी घेण्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही.असे महापौर पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: Mumbai Rani Baug Penguins: पेंग्विनच्या पिल्लाचं नामकरण; पहा ओरिओचे फोटो

फ्लिपरला पुन्हा मातृत्व

फ्लिपर या मादीने 2018 मध्ये पहिल्यांदा अंड दिले होते.त्यातून भारतातील पहिल्या पेंग्निवनचा जन्मही झाला होता.मात्र,अंड्यातून बाहेर आल्यावर अवघ्या आठवडाभरात त्या पेंग्विनचा जन्मजात दोषामुळे मृत्यू झाला होता.मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने दिलेल्या अंडातून 19 ऑगस्ट रोजी पिल्लाचा जन्म झाल आहे.हे पिल्लू अद्याप महिनाभराचेही नसल्याने त्याला घरट्यात ठेवण्यात आले आहे.असेही सांगण्यात आले.

हेही वाचा: धक्कादायक; बीडमध्ये रस्त्याने घेतला महिलेचा बळी;पाहा व्हिडिओ

तीन महिने परीक्षेचे

वयाच्या तीन महिन्यां पर्यंत पेंग्विनची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने ते आजारांना बळी पडू शकतात.त्यामुळे ओरिओ नंतर आता नव्या पेंग्विनवर डॉक्टरांची पथक 24 तास लक्ष ठेवून आहे.त्याच्या पालकांना सकस आहार पुरवला जात आहे.तसेच,रोज सकाळी या नवजात पेंग्विनचे वजन केले आहे.त्याचे पालक संपुर्ण संगोपन करत असल्याने सकाळी फक्त त्याला एक आहार पुरवला जात आहे.असेही सांगण्यात आले.

loading image
go to top