वांद्रे येथून कोट्यवधी रुपयांच्या उच्च प्रतीच्या विदेशी गांजासह दोन आरोपींना अटक

वांद्रे येथून कोट्यवधी रुपयांच्या उच्च प्रतीच्या विदेशी गांजासह दोन आरोपींना अटक

मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या उच्च प्रतीच्या विदेशी गांजासह दोन तस्करांना वांद्रे येथून अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी नऊ किलो वजनाचा विदेशी गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत 1 कोटी 62 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यश गिरीश कलानी आणि गुरु दयाल जयस्वाल अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरु आणि यश हे दोघेही वांद्रे परिसरात राहत असून ते ड्रग्ज तस्करीत सक्रिय होते. या दोघांनी त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या विदेशातून ऑनलाईन कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आणले आहेत, त्याची विक्रीसाठी ते वांद्रे परिसरात येणार आहेत अशी माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती, या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. तिथे यश आणि गुरु आले होते, यावेळी त्यांच्याकडे प्रत्येकी एक किलो वजनाचे उच्च प्रतीचे विदेशी गांजा सापडला, त्याची किंमत सुमारे 36 लाख रुपये होती.

या दोघांच्या चौकशीत त्यांनी आणखीन गांजाचा साठा वांद्रे येथील पाली गाव, बेझेंल हाऊसच्या 46/2मध्ये ठेवल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून आणखीन सात किलो गांजाचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी नऊ किलो गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत 1 कोटी 62 लाख रुपये आहे.

प्राथमिक तपासात हा गांजा अमेरिकेच्या कॉलिफोर्नियातून भारतात ऑनलाईन तस्करीमार्ग आणण्यात आला होता, त्यानंतर हा साठा मुंबईसह पुणे, दिल्ली, चेन्नई आणि बंगलोर शहरात वितरीत होणार होता. कुरिअर कंपनीच्या माध्यमातून संबंधित शहरातील एजंटच्या माध्यमातून त्याची विक्रीची आरोपींची योजना होता, याच कारवाईत पोलिसांनी दुसर्‍या आरोपीला ताब्यात घेतले. तपासात यश कलानी हा वांद्रे येथील कार्टर रोड तर गुरु जयस्वाल हा वांद्रे येथील माऊंट मेरी परिसरात राहतो.

विदेशी गांजाची तस्करी, खरेदी-विक्रीप्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

two people arrested from bandra by narcotic control bureau with imported illegal herbs powder

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com