

Mumbai Police Salary Scam
ESakal
मुंबई : पोलिसांचे पगार काढणाऱ्या आजी-माजी मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी सुमारे सहा कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असून, याबाबत अलीकडेच समतानगर पोलिस ठाण्यात एका निरीक्षकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर आता या प्रकरणात दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.