esakal | ‘ते ’एटीएमच्या माध्यमातून करायचे फसवणूक! वाचा कशी ती...
sakal

बोलून बातमी शोधा

‘ते ’एटीएमच्या माध्यमातून करायचे फसवणूक! वाचा कशी ती...

‘ते ’एटीएमच्या माध्यमातून करायचे फसवणूक! वाचा कशी ती...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना वसईत अटक करण्यात आली. राजवीर हसमुख भट (वय २८) आणि जितेंद्र तिवारी (३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५३ एटीएम कार्ड आणि काही रोख रक्कम असा ४ लाख २४ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

ही बातमी वाचली का? अवघ्या 4 दिवसात मुंबईच्या नव्या आयुक्तांनी आधीचे हे निर्णय बदलले...

वालीव पोलिस ठाण्याच्या परिसरात वसई फाटा येथे अॅक्‍सिस बॅंकेच्या एटीएममध्ये २८ वर्षीय तरुण २४ फेब्रुवारीला पैसे काढण्यास गेला होता. त्या वेळी दोघांनी दिशाभूल करून त्याच्या जवळचे एटीएम कार्ड बदली केले आणि त्याच्या एटीएममधून पैसे काढले होते. याबाबत फसवणुकीचा गुन्हा वालीव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. अशा तक्रारी वाढल्याने वालीवचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास चौगुले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलिस हवालदार मनोज मोरे, मुकेश पवार, पोलिस नायक सचिन दोरकर, सागर यादव, अनिल सोनावणे, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, पोलिस शिपाई विणेश कोकणी, सचिन बलीद, बालाजी गायकवाड, स्वप्नील तोत्रे, गजानन गरिबे यांचे स्वतंत्र पथक आरोपींच्या शोधासाठी तयार केले होते. दाखल गुन्ह्यांनुसार या पथकाने तपास करून मिरा रोड येथे राहणाऱ्या या दोघांना मोठ्या शिताफीने अटक केली, अशी माहिती वालीवचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले आहे.

ही बातमी वाचली का? मोबाईल फोन नोटांमुळे पसरतो कोरोना! जाणून घ्या शास्त्रीय कारण...

१० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
आरोपींच्या चौकशीत दोघे चोरटे मूळचे उत्तर प्रदेश येथील असल्याचे समोर आले. तसेच हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी वालीव पोलिस ठाण्यातील तीन, काशीमिरा पोलिस ठाण्यातील एका अशा ४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्यावर गुजरात राज्यात पाच आणि महाराष्ट्रात विविध पोलिस ठाण्यात पाच असे १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही उघड झाले आहे.