डोंबिवली : पोलिसांनी तपासले ५० सीसीटिव्ही; २ सोनसाखळी चोरांना अटक | Dombivali crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold robbery
डोंबिवली : पोलिसांनी तपासले ५० सीसीटिव्ही; २ सोनसाखळी चोरांना अटक

डोंबिवली : पोलिसांनी तपासले ५० सीसीटिव्ही; २ सोनसाखळी चोरांना अटक

डोंबिवली : सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये (Gold robbery case) वाढ झाली असल्याने या गुन्ह्यांची उकल करण्याकडे पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. मानपाडा पोलिस ठाण्याच्या (Manpada police station) हद्दीतील सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांनी तब्बल ५० सीसीटीव्ही फुटेज (Fifty cctv footage) तपासात १० गुन्ह्यांची उकल केली. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, आरोपींचे कपडे, शूज याआधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली (two culprit arrested) असून मनोजकुमार ठाकूर व विकेश तिवारी, अशी अटक आरोपींची नावे असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली. (Two thieves arrested in gold robbery after checking fifty cctv footage)

हेही वाचा: संभाजीराजे संतापले: रायगडावर ‘मदार मोर्चा’ वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न

सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश डांबरे, अविनाश वनवे, पोलिस हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी, प्रवीण किनरे, दीपक गडगे, भारत कांदळकर, महादेव पवार, यल्लप्पा पाटील, अनिल घुगे, दीपक जाधव, महेंद्र मंझा यांच्या पथकाने चोरीच्या घटना घडलेल्या भागात तब्बल ५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. यादरम्यान काळ्या रंगाच्या शाईन बाईकवर वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करताना हे आरोपी आढळून आले होते.

त्यांचा शोध घेत असताना दावडी गावात ही मोटरसायकल आढळून आली. त्याआधारे पोलिसांनी विकेश आणि मनोजकुमार यांना अटक केली. त्यांच्याकडून होंडा कंपनीची मोटरसायकल, दोन मोबाईल व सहा लाख ७५ हजार रुपये किमतीचे १३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण सात लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

१० गुन्ह्यांची उकल

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मानपाडा पोलिस ठाण्यातील तीन, टिळकनगर पोलिस ठाण्यातील पाच तसेच डोंबिवली व विष्णूनगर पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण १० गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimedombivali
loading image
go to top