इंग्लंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईतील हॉटेल्समध्ये दोन हजार क्वारंटाईन खोल्या तयार

इंग्लंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईतील हॉटेल्समध्ये दोन हजार क्वारंटाईन खोल्या तयार

मुंबई, ता. 21 : इग्लंडमधून मंगळवार रात्री पर्यंत पाच विमाने मुंबईत दाखल होणार आहेत. या विमानातील प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील विविध हॉटेल्स मध्ये 2 हजार खोल्या तयार ठेवण्यात आल्या आहे. त्याचबरोबर या पाच विमानातून येणाऱ्या ज्या प्रवाशांमध्ये लक्षणं आढळतील त्यांना थेट मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

बुधवारपासून युरोप आणि मध्य पुर्व आशिया खंडातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला महापालिकेच्या केंद्रांमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तर, या देशातील लक्षण असलेल्या प्रवाशांना फोर्ट येथील जी.टी.रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

इग्लंडमध्ये कोविड विषाणुचा नवा प्रकार आढळल्यामुळे बुधवार मध्यरात्री नंतर तेथून येणारी विमान सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, त्यापुर्वी मुंबईत साेमवार मध्यरात्रीपासून पाच विमाने येणार आहेत. या विमानातून हजारच्यावर प्रवासी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील विविध हॉटेल्स मध्ये 2 हजार खोल्या तयार करुन ठेवल्या आहेत. यात 1 हजार खोल्या फाईव्ह आणि फोर स्टार हाॅटेलमधील आहेत, तर 1 हजार खोल्या बजेट हाॅटेल्समधील आहेत. या सर्व प्रवाशांना सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहावे लागणार आहे. त्याचे शुल्क त्यांना भरावे लागणार आहे असेही आयुक्तांनी सांगितले. बुधवारपासून युरोप खंडातील इतर देशांमधून तसेच मध्य पुर्व आशिया खंडातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना महापालिकेच्या केंद्रांमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे असेही आयुक्तांनी सांगितले.

अमेरीकेसह, दक्षिण मध्य आशिया खंडातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यांच्या हातावर तसे शिक्केही मारण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

  • परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला मुंबईतच क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. मुंबईबाहेर राहाणाऱ्या प्रवाशांना सात दिवस घरी जाण्याची परवानगी मिळणार नाही.
  • इंग्लडहून आलेल्या प्रवाशांना सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंंटाईन करण्यात येणार आहे. त्यांची पाचव्या आणि सातव्या दिवशी आरटी पीसीआर चाचणी करुन घरी पाठविण्या बाबात निर्णय घेण्यात येईल.
  • बुधवारपासून युरोपमधील इतर देश आणि मध्य पुर्व आशिया खंडातून येणाऱ्या प्रवाशांना पालिकेच्या केंद्रांमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
  • प्रवाशांची विमानतळावर प्राथमिक तपासणी होणार असून यात लंडनमधील प्रवाशांमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास त्यांना सेव्हन हिल्स आणि युरोपच्या इतर देशासह मध्ये पुर्व आशिया खंडातील देशातील रुग्णांमध्ये लक्षणे आढळ्यास त्यांना जी टी रुग्णालयात दाखल करण्यात येणार. त्यांची स्वतंत्र  व्यवस्था करण्यात येणार.

( संपादन - सुमित बागुल )

two thousand quarantine rooms are ready for the people travelling from UK england

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com