महाराष्ट्रातील 2 हजार विद्यार्थी अडकले 'या' राज्यात, जेवणासाठी पायपीट अन् परतीची ओढ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

आयआयटी जेईई आणि नीट प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी गेलेले राज्यातील तब्बल 2 हजार विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. कोटा येथील मेस बंद झाल्याने विद्यार्थांना जेवणासाठी 3 ते 4 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

मुंबई : आयआयटी जेईई आणि नीट प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी गेलेले राज्यातील तब्बल 2 हजार विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. कोटा येथील मेस बंद झाल्याने विद्यार्थांना जेवणासाठी 3 ते 4 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हे विद्यार्थी महाराष्ट्रात येण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत असून त्यांना त्यांच्याकडून केवळ आश्वासनेच मिळत असल्याने विद्यार्थी भयभीत झाले आहेत.

मोठी बातमी बापरे ! धारावीत नवे 25 कोरोना रुग्ण. कोरोनाची ही चेन तुटणार तरी कधी ? 

कोटा येथे वैद्यकीय, आयआयटी पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी राज्यातील विविध जिह्यातून सुमारे 2 हजार विद्यार्थी लॉकडाऊनमुळे कोटा येथे अडकून पडले आहेत. तेथील खासगी शिकवणी वर्ग बंद आहेत, ऑनलाईन क्लासही होत नाहीत. तसेच शहरात कोरोना रूग्णांची संख्याही वाढत असल्याने विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे पालकांची चिंता अधिकच वाढली आहे.

नक्की वाचा : कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, मग काय आहेत यामागची कारणं ? जाणून घ्या...

उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील येथील मुलांना गाड्यांमधून त्यांच्यां राज्यात नेले आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थी एकाकी पडली आहेत. राजस्थान सरकारकडून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात येत असली तरी त्यासाठी विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. आम्ही विद्यार्थी आपापल्या घरात क्वारंटाईन करून घेऊ, असे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावचा विद्यार्थी ओम गडलिंग यांने सांगितले. राज्यातील अनेक लोकप्रतिनिधीकडे याबाबत पाठपुरावा सुरू असून केवळ आश्वासनेच मिळत असल्याचे या विद्यार्थाने सांगितले.

two thousand students of maharashtra state are stuck in quota


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two thousand students of maharashtra state are stuck in quota