

Accident during construction of building in Byculla
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बांधकामादरम्यान अनेक दुर्घटना घडत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशीच एक घटना मुंबईत भायखळा येथे घडली आहे. इमारतीच्या पायाभरणी आणि पायलींगच्या कामादरम्यान माती आणि मुरूम मजुरांवर कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये २ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात एकाच खळबळ पसरली आहे.