मुंबई : हिंदी सक्तीविरोधी शासन निर्णय मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आज वरळी डोम येथे 'मराठी विजयी मेळावा' पार पडत आहे. या मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल १८ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येत आहेत. या ऐतिहासिक मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी एक सूचक विधान करत भविष्यातील संभाव्य राजकीय युतीचे संकेत दिले आहेत.