Uddhav Thackeray : "मी त्यांना कुत्रा म्हणणार नाही कारण..." ; उद्धव ठाकरेंनी शिंदेंसह ED, CBI ला धुतले

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरे, असा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात रंगला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

आज काही लोक गळ्यात पट्टा बांधून त्यांच्यासोबत (भाजप) गेले, हे बाळासाहेबांनी कधी शिकवलं नाही. माझ्या वडिलांनी अन्यायासोबत लढायला शिकवलं. भाजपला लोकशाही मान्य नाही. सर्व संस्था लांडग्यांसारख्या विरोधकांवर सोडल्या आहेत. मी त्यांना कुत्रा म्हणत नाही कारण कुत्रे प्रमाणिक असतात. 

Uddhav Thackeray
Chhagan Bhujbal : "उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी..." ; राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र आणि उत्तर भारतीयांचा संबंध जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला काशीहून गा.गा. भट्ट आले होते. निवडणूक आयोगाने आमचा धनुष्यबाण हिसकावला. मात्र तुमच्या रुपाने प्रभू श्रीराम माझ्यासोबत आले आहेत. मी आव्हान दिलं आहे. तुम्ही मर्द आहात, या मैदानात मी येतो, मशाल घेऊन. मग पाहू.

राज्यात महाविकास आघाडी झाली. मात्र भाजपनेच काँग्रेससोबत जाण्यास भाग पाडले. पण मी भाजपला सोडलं. हिंदुत्व सोडलं नाही. भाजपचं जे हिंदुत्व आहे, ते आमचं हिंदुत्व नाही. बाळासाहेबांनी सांगितलेलं हिंदुत्व आम्ही मानतो. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व, असंही उद्धव म्हणाले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : 'मो गँबो आया था'! अमित शहांच्या पुणे दौऱ्यावर ठाकरेंची जहरी टीका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com