Uddhav Thackeray
Sakal
मुंबई
Uddhav Thackeray: आधीचे ठाणे आनंद देणारे, आताचे ठेकेदारांचे; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
Maharashtra Politics: राम गणेश गडकरी रंगायतन येथे अनंत तरे यांच्यावरील ‘अनंक आकाश’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.
ठाणे : ‘चित्रफीत पाहिल्यानंतर पूर्वीच्या ठाणे शहराची आठवण झाली. पूर्वीचे ठाणे शहर आनंद देणारे होते, पण आता कंत्राटदारांचे झाले आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि भ्रष्ट कारभार यांनी ठाण्याचा श्वास रोखल्याचा टोला त्यांनी लगावला. राम गणेश गडकरी रंगायतन येथे शनिवारी (ता. ११) अनंत तरे यांच्यावरील ‘अनंक आकाश’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

