

Uddhav Thackeray
ESakal
मुंबई : मतदार यादीतील कथित घोळाच्या संदर्भात आज मुंबईत ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमारांविरोधात गर्जना मोर्चा काढला आहे. मेट्रो सिनेमा या मोर्च्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. या मोर्चात केल्या जाणाऱ्या घोषनांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क दणाणून सोडले असून या मोर्चात बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमाकर यांच्यावर केली जोरदार टीका केली आहे. तसेच सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर ताशेरे ओढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांवर टीकास्त्र सोडले.