

Thackeray group Dipesh Mhatre will join BJP
ESakal
डोंबिवली : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्श्वभुमीवर तयारी करत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डोंबिवलीत मोठा धक्का बसला आहे. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे रविवार (ता. ९ नोव्हेंबर) रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत डोंबिवली जिमखाना येथे सकाळी 11 वाजता हा प्रवेश होणार आहे.