मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार; मुख्यमंत्र्यांकडून मेट्रोला हिरवा झेंडा

मेट्रो सुरु झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार; मुख्यमंत्र्यांकडून मेट्रोला हिरवा झेंडा

मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभदिनी आज मुंबईकरांना मोठी भेट मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फीत कापून मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चे लोकार्पण केले आहे. या दोन्ही मार्गाच्या मेट्रो सुरु झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीतून ही त्यांची सुटका होणार आहे. (CM Uddhav Thackeray Inaugurate Mumbai Metro)

मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार; मुख्यमंत्र्यांकडून मेट्रोला हिरवा झेंडा
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपद निवडणूक : भाजपाचा मास्टरप्लान, सुमित्रा महाजनांचं नावही चर्चेत

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७, दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो २ अ या दोन्ही मार्गांचा पहिला टप्पा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रवाशांच्या सेवेला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून, सहा डब्यांच्या ११ मेट्रोच्या दिवसभरात १५० फेऱ्या धावणार आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत दर 11 मिनिटांच्या अंतराने मेट्रोची सेवा नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे.

चालकाविना मेट्रो धावणार

मेट्रो 7 आणि मेट्रो 2 अ मार्गावर प्रथमच स्वदेशी बनावटाच्या मेट्रो धावणार असून, या मेट्रोत विनाचालक आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मेट्रो विनाचालक धावू शकतात; मात्र सुरुवातीला सात ते आठ महिने चालकांद्वारे मेट्रो चालवल्या जाणार आहेत.

मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार; मुख्यमंत्र्यांकडून मेट्रोला हिरवा झेंडा
''मेट्रो-3 च्या उद्घाटनाला आम्हाला बोलावले नाही तरी चालेल पण''...

असा असेल मेट्रो मार्ग

मेट्रो 2 अ : दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसार, पहाडी एक्सर, कांदिवली, डहाणूकर वाडी

मेट्रो 7 : आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवी पाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरी पाडा, दहिसर पूर्व

प्रवासी भाडे (रुपयांमध्ये)

0 ते 3 किलोमीटर - 10

3 ते 6 किलोमीटर - 20

6 ते 9 किलोमीटर - 30

9 ते 12 किलोमीटर - 40

12 ते 15 किलोमीटर - 50 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com