

उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानाजवळ ड्रोनच्या संशयास्पद घिरट्यांमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर नजर ठेवली जात असल्याचा शिवसेना नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. मातोश्री जवळ ड्रोन घिरट्या घालत असल्याचे एका सुरक्षा रक्षकाने बघितले आणि याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. यानंतर हा प्रकार उघड झाला. मात्र हे ड्रोन एमएमआरडीकडून महत्त्वाच्या कामासाठी उडविले जात असल्याचे सांगितले जात आहे.